मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुटीची चर्चा आणि माध्यमांची पतंगबाजी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवस सुट्टी घेतली त्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाली आहे. यावरून माध्यमांनी पतंगबाजी सुरू केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल, अजित पवारांची नाराजी इथं पासून खारघर दुर्घटनेबाबत संबंध जोडला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सुटीची अधिकृत माहिती दिली नाही. मात्र ते 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यांच्या गावी ते देवदेव करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल आपल्या बाजून लागावा, यासाठी एकनाथ शिंदे गावातल्या देवीला साकडे घालणार असल्याची चर्चा आहे. भाजप अजित पवारांना सोबत घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले. ते त्यांना उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनी हा पर्याय निवडल्याचेही काही जणांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी राज्यपालांची भेट घेऊन दबाव वाढवला. यामुळेही एकनाथ शिंदे सुटीवर गेल्याचा प्रचार काही जणांकडून सुरू आहे.