तर मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे कपडे ठेवणार नाही; नितेश राणेंचा इशारा

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आजपासून नितेश राणे यांची संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद होणार आहे. आज सकाळीच संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर नितेश राणे यांनी आपली पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे कुटुंबियांच्या सर्व गोष्टी आम्हाला माहित आहेत. यापुढे राऊत भाजपवर बोलले तर ठाकरेंचे कपडे फाडेन,” असा धमकीवजा इशारा आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना दिला. आज ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी राणे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर राऊत यांनी बोलू नये. त्यांनी विचार करून भाजपवर बोलावे. त्यांच्यासारखे लोक बाजारात विकत मिळतात. आम्ही खरे शिवसैनिक आहोत. राऊतांनी अजून राणेंना ओळखलेल नाही. त्यांच्यामुळे ठाकरे कुटुंबियाची बदनामी होत आहे. उद्धव ठाकरेंवर भ्रष्ठाचार तर आदित्य ठाकरेंवर खूनाचा आरोप झाला आहे. पाक ज्याचे गोडवे गातोय त्या मलिकला राऊत भेटतात. त्यामुळे राऊत यांच्यावर देशद्रोही म्हणून खटला चालवावा, अशी सरकारला विनंती करणार आहे,” असेही राणे यांनी म्हटले आहे.

संजय राऊतांनी भाजपा नेत्यांविरोधात वक्तव्य करणं थांबवावं अन्यथा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडू, असं नितेश राणे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना इशारा दिला आहे. तसंच, ही पत्रकार परिषद संजय राऊतांनी सेव्ह करून ठेवावी, जेणेकरून मी वॉर्न केलं नव्हतं असं होणार नाही, असंही नितेश राणे म्हणाले.