मॉरिशसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. या पुतळ्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशसमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ देखील उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सकाळी मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ते मॉरिशसमधील विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच काही सामंजस्य करारही करण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करुन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण आज मॉरिशस येथे होणार. समुद्रापार घुमणार शिवगर्जना! छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभारला जातोय. त्याचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभते आहे. यापेक्षा आनंद तो कोणता असे लिहिले आहे.
