मागील वर्षी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केला होता. संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील शिवाजी नगर येथील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव साळूंखे यांना अटक करण्यात आली आहे. राजीव साळूंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहेत, किरीट सोमय्या यांनी माहिती ही दिली आहे.
पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मुंबई पोलिसांनी लाईफलाईन कंपनीच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबईच्या राजू साळुंखे पार्टनरला पोलिसांनी अटक केली. या घोटाळ्यामुळे ३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. संजय राऊत यांचा साथीदार सुजीत पाटकरचा हा घोटाळा मी उघडकीस आणला होता.
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये कोरोना काळात मोठा घोटाळा झाला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफ लाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. याचदरम्यान अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.
