निर्णय कालच होणार होता, अजित पवारांना होती पवारांच्या राजीनाम्याची कल्पना

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय आज कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. परंतु देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल 1 मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असं अजित पवारांनी बोलताना सांगितलं आहे

अजित पवार म्हणाले , नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रदेशाध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचनक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र त्यांनी स्वतःपासून फिरवली.

यावेळी कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री, नेते पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. पण फक्त अजित पवार हेच शरद पवारांच्या निर्णयाच्या पाठिशी असल्याचं दिसून आलं. याबाबत अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पवारांच्या या निर्णयावरुन चांगलेच ठणकावल्याचे पाहायला मिळाले.

“सगळ्यांच्या भावना ऐकल्या, पाहिल्या. मात्र या निर्णयाबद्दल सर्वांनी गैरसमज करुन घेतला आहे. ते अध्यक्ष नाहीत म्हणजे म्हणजे पक्षात नाही असे नाही. कॉंग्रेस पक्षाबाबत आपण पाहत आहोत, खर्गे अध्यक्ष असतील तरी पक्ष सोनिया गांधी चालवतात,” असे अजित पवार म्हणाले. तसेच “नवीन नेतृत्वाकडे जबाबदारी देऊ पाहत आहेत, त्यांच्या डोळ्यासमोर नवीन अध्यक्ष तयार झालेला तुम्हाला मान्य नाही का,” असा सुचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.