बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये बोलताना ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावात हे वक्तव्य केले. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.
चंदगड येथे ते माध्यमांशी बोलत होते ‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री फडणवीस असे बॅनर झळकले होते. तसेच, त्यांच्यापूर्वी धाराशिव येथे अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
तसंच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार अशी घोषणा केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच चंदगडला पुन्हा एकदा येणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
