क्रिकेट प्रेमींना भारत-पाकिस्तान सामन्याची ते भारत-पाकिस्तान सामन्याने. 1992 पासून वनडे असो किंवा टी 20 दोन्ही वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये सामने झाले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना नसेल, तर त्या वर्ल्ड कपला मजाच येणार नाही. वनडे वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकदाही पाकिस्तानी टीमला भारतावर विजय मिळवता आलेला नाही. टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या स्टेजवर नेहमीच पाकिस्तान विरुद्ध सरत्यास खेळ दाखवलाय.
यावर्षी वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटला सुरुवात होईल. इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर बीसीसीआय वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर करणार आहे. सर्वच क्रिकेट रसिकांना उत्सुक्ता आहे ती, भारत-पाकिस्तान सामन्याची. वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान लढत यंदा कुठल्या शहरात रंगणार? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
यंदा वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चाहते येतात. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठ स्टेडियम आहे. 1 लाख प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता या स्टेडियममध्ये आहे. त्यामुळे बीसीसीआय ने भारत-पाकिस्तान लढतीसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमची निवड केली आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय.
वर्ल्ड कपमध्ये एकूण 48 सामने होतील. बाद फेरीचे तीन राऊंड होतील. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा 46 दिवस चालणार आहे. सात ठिकाणी साखळी फेरीचे सामने होतील. टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला, तर तिथे भारताचे दोन सामने होतील.
