महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना आता गप्प बसा असा सल्ला दिला आहे.युवा संवाद सामाजिक संस्था व कार्टूनिस्ट्स् कंबाईनतर्फे बालगंधर्व कला दालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. उपस्थितांच्या आग्रहाखातर राज ठाकरे यांनी अवघ्या एका मिनीटाच अजित पवार यांचे व्यंगचित्र या व्यंगचित्राखाली ‘आता गप्प बसा’ असे लिहू का’ असा मिश्किल प्रश्नही केला.
त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून व हसून त्यास दाद दिली.राज ठाकरे म्हणाले, ‘‘व्यंगचित्रे काढायला माझे हात रोजच शिवशिवत असतात. परंतु हवी तशी निवांत बैठक जुळून येत नसल्याने व्यंगचित्र काढत नाही. पण माझी व्यंगचित्रे भाषणातून बाहेर पडतात. मी व्यंगचित्रात-चित्रात रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असते.
