शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय रद्द

माझ्याकडून कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. मी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारलं तरी कोणंतही जबाबदारीचं पद घेणार नाही, पक्षात आता उत्तराधिकारी निर्माण झाला पाहिजे असेही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

पक्षाच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारी बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली होती. त्यामध्ये जेष्ठ नेत्यांनी याबाबत ठराव केला होता. त्याचा मान राखून राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर करत असतांना उत्तराधिकारी असणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

यामध्ये पक्षात नवीन कार्याध्यक्ष पद निर्माण करण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा देखील झाली होती. याशिवाय अजित पवार यांच्याही नावाची चर्चा होऊ लागली होती. अशातच नवीन नेतृत्व घडविण्यावर भर असेल असं शरद पवार यांनी म्हंटलं होतं.