कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असून काँग्रेसकडून प्रचारादरम्यान जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचा प्रस्तावाचा समावेश करण्यात आला आहे.कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस कॉंग्रेस पक्षाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची भाजपची मागणी सोनिया गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूकीत सार्वभौम शब्द उच्चारला म्हणून भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे
भाजपच्या मते लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पक्ष निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र देत असतात. त्यानुसार राष्ट्राची एकता अखंडता आणि सार्वभौमत्वाप्रती समर्पित असते. सोनिया गांधी यांनी या नियमांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप भाजप ने केला आहे.केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
त्यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात हुबली इथं दिलेल्या भाषणात कर्नाटक सार्वभौमत्व असा शब्द वापरला होता. मात्र, सार्वभौमत्व हा शब्द राज्यासाठी नाही तर देशासाठी वापरला जातो.म्हणून त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सोनिया गांधी यांनी काय होत ते वक्तव्य?
6 मे रोजी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हुबली इथल्या प्रचार सभेत भाजपवर टीका करताना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केलं होतं. तसेच कॉंग्रेस कोणालाही कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमतेला, अखंडतेला धोका निर्माण करण्याची परवानगी देणार नाही’ असे वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलं होत.
