इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 53 व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमने-सामने येणार आहे. सोमवारी, 8 मे रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. कोलकाताच्या घरच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. ईन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना पाहायला मिळेल.
पंजाब किंग्जचा संघ 10 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. तर कोलकाता 10 सामन्यांतून 8 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. परिणामी पंजाब 2 गुण मिळवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. तर कोलकातासाठी आजचा सामना करो किंवा मरो सारखा असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे पंजाबला अद्याप यश मिळालेले नाही. एकूणच हेड टू हेडबद्दल बोलायचे तर दोन्ही संघ 31 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 20 वेळा तर पंजाबने 11 वेळा बाजी मारली आहे.
आज पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामना कोलकाताच्या घरच्या ईडन गार्डन मैदानावर पार पडणार आहे. ईडन गार्डन स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या स्टेडियमच्या लहान आकारामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान, या मैदानावर दव महत्त्वाची भूमिका बजावते. दव पडल्यानंतर फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळू लागते, त्यानंतर धावा काढणं कठीण होतं.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
कोलकाता नाईट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
पंजाब किंग्स : प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
