खासदार संजय राऊत याची अवस्था कुत्र्यासारखी आहे. तो रोज सकाळी उठतो आणि भुंकतो. आमच्या मतावर राज्यसभेवर गेलेला तो महाकुत्रा आहे, अशी जहरी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.
शिवसेना (ठाकरे गटाचे)च मुख पत्र सामना या मुखपत्रात एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर जहरी टीका केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडून गेल्याने आमदारांचे हाल उकिरड्यावरच्या कुत्र्यापेक्षाही बेकार होणार आहे. बंड केलेल्या ४० आमदारांची तुलना ही भटक्या कुत्र्यासोबत केली गेली आहे. सत्तार यांनी प्रतिउत्तर देऊन खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘ ज्या कुत्र्याला आम्ही आमच्या मतावर राज्यसभेत पाठवलं आणि त्यानंतर तो आम्हाला कुत्रा म्हणता असलं तर त्याच्या सारखा महा कुत्रा कोणीच नसेल, असे म्हणता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
सत्तार म्हणाले, तो कुत्र्याची नाही जर माणसाची अवलाद असेल तर त्याने राजीनामा द्यावा. त्याने राजीनामा दिला तर मी पण राजीनामा देईल.संजय राऊत यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावं मी राजीनामा देईन.राऊत याच्यापेक्षाही वाईट शब्द आम्हाला बोलता येते. त्याचा जर बिस्मिल्ला केला असता तर त्याला कोणी विचारले असते का? असा सवालही सत्तार यांनी केला.
