मुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; केलं इमर्जन्सी लँडिंग

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. शिंदे हे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे जात असतान ही घटना घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा दौऱ्यावर जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा आणि पाटण येथे दौऱ्यावर जात होते. यावेळी ही घटना घडली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱा अचानक रद्द करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील राजभवन येथून ते सातारा पाटण येथे दौऱ्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा-पाटण दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जात आहे. पुढच्या ३० मिनिटात दुरुस्ती होऊन हेलिकॅाप्टर पुन्हा उड्डाण करणार असल्याची माहिती समजते.