पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा संपूर्ण कायापालट झालेला आहे.अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूक बँक ‘मॉर्गन स्टेन्ली’च्या अहवालात हा गौरव करण्यात आला आहे.मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या वाटचालीच्या बळावरच भारत जगातील सर्वाधिक बलाढ्य अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला आहे.
डिजिटल, आयटी, फार्मसीसारख्या अनेक क्षेत्रात भारताकडे जगाचे नेतृत्व आले आहे. मोदींनी भारताचा आवाज जगभरात बुलंद केला आहे. जागतिक बाजारामध्ये भारताबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण केली आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून ही उत्सुकता मोठमोठ्या संधींमध्ये रूपांतरित केली, असा गौरव या अहवालातून करण्यात आला आहे.अन्य देशांच्या बिकट आर्थिक स्थितीत भारत जगासाठी दीपस्तंभ ठरतोय. भारताची वाटचाल जगासाठी आशेचा किरण ठरत आहे.
‘मॉर्गन स्टेनली’चे निष्कर्ष
1) अमेरिकेतील एक बँक म्हणून आम्ही आर्थिक क्षेत्रातील मोदींचे कर्तृत्व खुल्या दिलाने मान्य करतो.
2) 2010 पर्यंतच्या परिस्थितीच्या तुलनेत गेल्या 9 वर्षांत विविध क्षेत्रांत भारताने प्रगतीचे मोठे पल्ले गाठले आहेत.
3) आशिया खंडच नव्हे, तर जगाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठी भूमिका निभावण्यासाठी भारत आता सज्ज आहे.
मोदींनी काय केले?
1) मोदी सरकारने भारतात कॉर्पोरेट करांचे दर जगातील अन्य देशांच्या बरोबरीला आणून ठेवले, असे ‘मॉर्गन स्टेनली ने स्पष्ट केले आहे.
2) मोदींच्या काळात पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढली.
3) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन सातत्याने व वेगाने वाढत गेले. यामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली.
4) जीडीपीच्या टक्केवारीत डिजिटल व्यवहारांचे प्रमाणही वाढले आहे. अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक संघटित होत चालल्याचे हे संकेत आहेत.
भारताच्या जीडीपीची जगात सर्वाधिक वेगाने वाढ
आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी- मार्च) देशाचा विकास दर 7.2 टक्के राहिला. जगातील हा सर्वाधिक वेग ठरला आहे.
भारताने चौथ्या तिमाहीत चीनपेक्षा दीडपट जास्त विकास साधला. जपान, फ्रान्ससारख्या देशांहून पाचपट जास्त विकास आहे. ब्रिटन-जर्मनीसारखे देश अजूनही एक टक्का विकास उदिष्ट गाठण्यासाठी झटत आहेत. देशाच्या जीडीपीचा आकार 160 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर गेला आहे. गेल्या तिमाहीत 149.20 कोटी रुपये होता.
