पावसाने नुकसान‎ झालेल्‍या पिकांची भरपाई या‎ आठवड्यात खात्‍यात वर्ग होईल – राधाकृष्‍ण‎ विखे पाटील

राज्‍यात जनतेच्‍या मनातील सरकार ‎ असल्‍यामुळेच लोकांच्‍या हिताचे‎ निर्णय होत आहेत. सर्व समाज ‎ ‎ घटकांसाठी योजनांची‎ अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू‎ आहे. सततच्‍या पावसाने नुकसान‎ झालेल्‍या पिकांची भरपाई, या‎ आठवड्यातच शेतकऱ्यांच्‍या‎ खात्‍यात वर्ग होईल, अशी ग्‍वाही‎ महसूल, पशुसंवर्धन व दुग्‍ध‎ व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण‎ विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी‎ संवाद साधतांना दिली.‎ ‎

आज त्यांनी वाकडी परिसरातील रहिवाशांच्या समस्‍या जाणून घेतल्‍या. शासन आपल्‍या दारी या उपक्रमाचा आढावा घेतला. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून सरकारी योजनांची अंमलबजावणी व वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.शासन‎ आपल्‍या दारी या उपक्रमाचा‎ आढावाही त्‍यांनी आधिकाऱ्यांकडून‎ घेतला. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून‎ शासन योजनांची अंमलबजावणी‎ ‎अधि‍क प्रभावीपणे करण्‍याचे आदेश‎ त्‍यांनी आधिकाऱ्यांना दिले. वाड्या‎ वस्‍त्‍यांवरील रस्‍त्‍यांच्‍या‎ समस्‍यांबाबत त्‍यांनी अधिकाऱ्यांना‎ महत्त्वपूर्ण सूचना देऊन काही‎ रस्‍त्‍यांसाठी उपलब्‍ध झालेल्‍या‎ निधीची माहिती ग्रामस्‍थांना दिली.‎ यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.‎

वीज वितरण कंपनीच्‍या बाबतीत भेडसावणाऱ्या समस्‍यांबाबत अधिकाऱ्यांना तातडीने जिल्‍हा विकास नि‍योजन समितीकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याच्‍या सूचना दिल्‍या. ट्रान्‍सफॉर्मर उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने निधी उपलब्‍ध करून देण्‍याची ग्‍वाही दिली.यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहारे, बापूसाहेब लहारे, विवीध विभागांचे अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.जमिनींच्या मोजणीबाबतची बहुतांश प्रकरणे आता निकाली निघत आहेत. त्यासाठी रोवर तंत्रज्ञानाची मोठी मदत यासाठी झाली आहे. जिल्‍ह्यामध्‍ये सुरू झालेल्‍या शासनाच्‍या वाळूविक्री केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळतो. सहाशे रुपये प्रतिब्रास दराने वाळू उपलब्ध होते आहे. शेतकऱ्यांना आता एका रुपयात पीकविम्याचा लाभ दिला जाईल.असंही यावेळी विखे पाटील म्हणाले.