ठाकरे गट संपवण्याचे कंत्राट संजय राऊत यांनी घेतले आहे – संजय शिरसाट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सतत शिवसेनेवर आणि भाजपवर टीका करत असतात. काल संजय राऊत यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबदल प्रश्न विचारलाला असता त्यांनी उत्तर न देता थुंकले. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा वागण्याचे कारण म्हणजे, संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांचे कोणाशीच जमत नाही, अशी टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली. तसेच अशी लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल आहे, माझ्याकडे याचा व्हिडिओ आहे, असा खळबळजनक दावा शिरसाट यांनी केला.

संजय राऊत यांनी केलेल्या कृतीवरुन शिंदे गटातील नेत्यांकडून तीव्र पडसाद उमटले आहेत. याबाबत संजय शिरसाट यांना पत्रकारांनी विचारले अससता ते म्हणाले, राऊत यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो दाखवा, उद्धव ठाकरे यांचा गट संपवण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सर्व कळते, त्यांना योग्य वेळी उत्तर दिले आहे. प्रसिद्धी मिळवणे हाच यांचा धंदा आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.संजय राऊतांनी पत्राचाळ घोटाळा केला आहे, हे मी जनतेसमोर आणणार आहे.या प्रकरणाचा तपास होऊन लवकरच संजय राऊत पुन्हा तुरुंगात जातील असा दावा संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केला.

शिरसाट पुढे म्हणाले, नाशिकच्या शिवसैनिकांना विचारा यांनी काय गोंधळ घातला. एका महिलेला यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्या महिलेपासून राऊत यांना एक मुल आहे. याचा व्हिडिओ लवकरच बाहेर येईल, अशी लायकी नसलेली माणसे राजकारणात आहेत, अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली.