राज्यातील सत्तांतराला एक वर्ष पूर्ण झाले असून ह्या वर्षात अनेक घडामोडी घडल्या तसेच शिंदे गटातील अनेकांना मंत्रिपदाचा अपेक्षा होती पण एक वर्ष होऊनही मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गट-भाजप आमदारांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती आखेल त्या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त भेटला नाही. परंतु आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. हा विस्तार छोटेखानी असेल अशी महिती समोर आली आहे. दिल्लीतूनच तसे आदेश देण्यात आले आहेत, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 6 आणि शिवसेनेच्या 4 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.भाजपचे 4 कॅबिनेट मंत्री तर 2 राज्यमंत्री आणि शिंदे गटाचे 2 कॅबिनेट मंत्री तर 2 राज्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे.मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काहीजण नाराज होण्याची शक्यता लक्षात घेता महामंडळाचे वाटप करुन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कुठल्या महामंडळावर कुणाची वर्णी लावावी यासाठी यादी तयार केली जात आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार19 जून पर्वी होण्याची दाट शक्यता असल्याने भेटीगाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. छोटेखानी विस्तार लवकरच उरकला जाईल. काही इच्छुकांना महामंडळ देऊन त्यांची बोळवण केली जाईल. तर उर्वरित 13 मंत्रिपदाचे वाटप हे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केले जाऊ शकते.
