आरपीआयला विधानसभेच्या 10 ते 15 जागा मिळाव्या; रामदास आठवलेंची शिंदे-फडणवीसांकडे मागणी

रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला संधी मिळाली तर मी शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आमच्या राज्यात दोन जागा निवडून आल्या तर पक्षाला मान्यता मिळेल म्हणून मी अमित शाह यांच्यासोबत चर्चा करणार आहे. पक्षाला येत्या निवडणुकीत दोन ते तीन जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीबाबातही त्यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या 2 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. यातील एक शिर्डी आणि विदर्भातून एक जागा मिळावी आणि विधानसभेच्या 10 ते 15 जागा मिळाव्या, अशीही मागणी आठवलेंनी केली आहे. यामुळे रामदास आठवलेंची मागणी शिंदे-फडणवीस पूर्ण करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दलित पँथर ही सामाजिक संघटना असून संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून दलित पँथर रिपाईची विंग म्हणून कार्य करू शकते का याचा निर्णय पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बोलून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लवकरच लागणार असून हा छोटेखानी असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदार राज्यमंत्री होतील, असे समजत आहेत.

नवे संसद भवन मोदींनीच बांधल्यामुळे त्यांनीच त्याचे उद्घाटन करावे हा एनडीएचा निर्णय होता. ओडीशातील रेल्वे अपघातात पंतप्रधान, रेल्वे मंत्री परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येत असून विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये. महाराष्ट्रात दररोज संजय राऊत, अजित पवार ऐकमेकांवर आरोप करीत असून त्यांनी हे आरोप-प्रत्यारोप थांबविण्याची गरज आहे.असंही यावेळी आठवले म्हणले.