ठाकरे गट आणि शिंदे गटाचा वाद सर्वश्रुत आहे शिंदे गटातील नेते नेहमीच सांगतात की शिवसेनेचं संजय राऊतांमुळे मोठे राजकीय नुकसान झाले आहे कारण संजय राऊत अगोदरपासूनच भाजपच्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका करून शिवसेना भाजप महायुतीत मिठाचा खडा संजय राऊत यांनीच घातला असेही बोलले जात आहे.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी राजीनामा देऊन जनतेतून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान राज्याचे ग्रामीण पुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त सोमवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.आमचे उद्धव ठाकरेंशी वैर नाही पण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी अभद्र युती केली त्याला आमचा विरोध होता म्ह्णून आम्ही बाहेर पडलो असे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.
शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी गुलाबराव पाटलांना शुभेच्छा देताना म्हणाले मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्यास आमचे पाय कापायला दोन्हीकडूनही सुरुवात होईल अस किशोर पाटील म्हणाले आहेत.
तर, संजय राऊत आमच्या मतावर खासदार झाले असून दम असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा व पुन्हा खासदार होऊन दाखवावं असं थेट आवाहन गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊत यांच्यासारख्या नतदृष्ट लोकांनी शिवसेनेची वाट लावली असून त्यामुळे त्यांना आमचा कायम विरोध असून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक त्यामुळे राऊतांनी आम्हाला अक्कल शिकू नये असा थेट हल्लाबोलही गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे
