आव्हाड, छप्पराने आभाळ व्हायचा उद्धटपणा करू नये; ठाण्यात बॅनरबाजी

जितेंद्र आव्हाड हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात त्यांनी महापुरुषांविषयी असो या काही समाजाविषयी असो जितेंद्र आव्हाड नेहमीच वादग्रस्त विधान करतात. काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी काही संदर्भ देत असतांना औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा नव्हता असं म्हंटलं होत. त्यानंतर संपूर्ण राज्यात आव्हाड यांच्या विरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले कोणीही काही आंदोलन करू द्या, मी माझ्या प्रश्नावरती ठाम आहे. मी माझी जे वक्तव्य केले त्यावर ठाम आहे. मी जो प्रश्न विचारला तो तुम्ही फिरवलात, तुम्ही माझा बाईट तोडून दाखवला, पूर्ण दाखवला नाहीत, औरंगजेब हा क्रूर होता. त्याने आईला मारलं, बापाला मारलं असं म्हणत आव्हाड यांनी सारवासारव केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी टीका केली होती. धर्मवीर आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. यावरून आता ठाण्यात बॅनर वॉर रंगले आहेत. कळवा नाका परिसरात आनंद दिघे यांच्या फोटोसह काही मजकूर लिहिलेला बॅनर लावण्यात आला आहे. यावर थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.

राज्यात आव्हाड-म्हस्के वादावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यातच आता बॅनरवरून थेट ठाकरे गटालाच प्रश्न विचारण्यात आला आहे. कळवा परिसरात बॅनर लावण्यात आले असून थेट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटावर निशाणा साधला जात आहे. जितेंद्र आव्हाड जे काही बोलतायत ते खरं आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरून चालू असलेल्या वादातून शिवसेनेने हे बॅनर लावले आहेत. यावर म्हटलं की, सुरक्षा कमी करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारख्या दरारा असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भीती दाखवायचा निष्फल प्रयत्न करणारे पळपुटे तुम्ही साहेबांना जामीन देणारे तुम्ही कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मदत तीही तुमच्याकडुन? मागितली असं बरळता? थुंकी विकास आघाडीचे थेंब आहात तुम्ही आव्हाड छप्पराने आभाळ बनायचा उद्धटपणा करू नये.