मान्सूनने केरळमध्ये हजेरी लावली आहे. मान्सूनने आपली वाटचाल पुढे सुरु केली आहे. आता कधीही मान्सून केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. त्याचवेळी दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ आज त्याचे भीषण रूप दाखवणार आहे. हे चक्रीवादळ पुढच्या 36 तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. यामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 630 किलोमीटरवर अंतरावर आहे.
बिपरजॉयचा प्रभाव देशातील चार राज्यांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या आसपासच्या भागात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळे केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीपासून मच्छिमारांना दूर राहण्याचा सल्ला भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे पुढील 36 तासांत आणखी तीव्र होणार आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल.
मान्सूनची सर्वच जण चातकाप्रमाणे वाट पहातायत. कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रीय होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. मान्सून महाराष्ट्रात कधी सक्रीय होणार याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातो. पण मान्सून सक्रीय कधी होणार? पाऊस कधी येणार? याचे अचूक ठोकताळे किनारपट्टीवरचा मच्छिमार सुद्धा बांधत असतात. सध्या कोकण किनारपट्टीवर निसर्ग बदललाय सुरवात झालीय आहे. त्यामुळे मान्सून सक्रीय होणार आहे.
राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र पट्ट्यामध्ये काही भागांत पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर शनिवार रविवारच्या सुट्ट्यांसह पुढील दोन दिवस म्हणजेच एकूण येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील तापमानाचा आकडा वाढणार आहे. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तापमानात येत्या दिवसांमध्ये वाढ नोंदवली जाऊ शकते. थोडक्यात सकाळच्या वेळी ऊन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा, तर संध्याकाळच्या वेळी पाऊसधारा असंच काहीसं वातावरण पाहायला मिळणार आहे. किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वादळी वारे पाहता सध्या मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
