सुधारित भारताच्या विकासासोबत सांस्कृतिक, आध्यात्मिक उत्थानाचे कामही मोदी सरकारने केले -राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी

मीटिंग विथ टिफिन’ कार्यक्रम सतराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी धर्म रक्षणाचे कार्य हाती घेतले. त्यानंतर धर्मरक्षणासाठी कुणाचे नाव पुढे येईल तर ते नाव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आहे. मोदी सरकारने नऊ वर्षात भारताचा सर्वांगीण विकास करत धार्मिक व सांस्कृतिक उत्थानाचे कार्य सुद्धा केले असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश जी यांनी केले. स्थानिक बडनेरा रोडवरील महेंद्र लॉन्स येथे भाजपाच्या वतीने ‘टिफिन विथ मीटिंग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवप्रकाश जी बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात भव्य असे महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. त्या अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, भारताची प्राचीन परंपरा असलेला योगा, आयुर्वेदा यावर सरकारने लक्ष केंद्रित करत त्याला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्ममानाचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. काशी विश्वनाथ मंदिर, उज्जैन येथे महाकाल लोक इत्यादी धार्मिक स्थळांचा विकास करत आध्यात्मिक वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपला आहे. जागतिक पातळीवर भारताला स्वाभिमान उपलब्ध करून देत आज भारताची प्रतिमा उंचावली आहे.

नऊ वर्षात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने जनतेचे भक्कम आशीर्वाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार व ज्येष्ठ नेते चैनसुख संचेती, आमदार अशोक उईके, आमदार प्रवीण पोटे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

खासदार डॉ.बोंडे झाले वाढपी भाजपच्या ‘टिफिन विथ मीटिंग’ कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मान्यवरांची भाषण झाल्यावर महेंद्र लॉन्स सभागृहात सर्वांनी स्गोल राऊंड करत स्वतःच्या घरून आणलेल्या सामूहिक स्नेहभोजनाचा आनंद घेतला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सुद्धा आपला डबा उघडून जेवायला घेतले. सोबत त्यांनी उपस्थितांना वाढन सुद्धा केले.