प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद खासदार डॉ. अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ चा कार्यक्रम स्थानिक यशोदा नगर येथील गल्ली नंबर दोन येथे आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत मन की बात कार्यक्रम ऐकून घेतला. यावेळी राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन नागरिकांशी संवाद साधला. तसेच केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामकाजाची माहिती त्यांना दिली.

जगभरात विशेष लोकप्रिय असणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ हा कार्यक्रम हा यशोदा नगर गल्ली नंबर दोन येथील बुथ क्रमांक 149 येथे शक्तिकेंद्र प्रमुख दीपक गिरोळकर यांच्या निवासस्थानी पार पडला.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या विविध कामकाजाची माहिती देत असतात. तसेच देशभरात विविध ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा या कार्यक्रमात उल्लेख करून गौरव करतात. तसेच देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्या बाबींवर ते भाष्य सुद्धा या माध्यमातून करत असतात. कश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारताचा सुरू असलेला विकास इत्यादी विषयी ते मनमोकळेपणाने नागरिकांशी थेट संवाद साधतात. देशातील प्रमुख दूरचित्रवाहिन्यांवर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत असते.