दरोडे टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं योग्य नाही, गेली पंधरा-वीस वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला ते जनतेचे हजारो कोटी रुपये कुठे गेले याचा हिशोब आता कॅग विचारणार आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात उबाठा पक्ष 1जुलैला भ्रष्टाचारा विरोधात मोर्चा काढणार आहे याबद्दल प्रश्न विचारला असता शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारविरोधात ठाकरे गटाकडून 1 जुलै रोजी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत कॅगने ताशेरे ओढले. एसआयटीची स्थापना झाल्याने त्यांच्या पायाखलची जमीन सरकली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवसेना ठाकरे गटाकडून 1 जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
बीएमसीची SIT चौकशीमुळे ठाकरेंच्या पायाखालची जमीन सरकली
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही. गेली 15-20 वर्षे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले, याचा हिशेब कॅग विचारणार आहे. एसआयटी स्थापन झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. दूध का दूध पानी का पानी होईल. उलटा चोर कोतवाल को दांटे असा प्रकार आहे. कॅगच्या ताशेऱ्यावर एसआयटी लावली आहे. ती निष्पक्षपणे काम करेल. मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांच्या तिजोरीत राहायला हवा. तो कोणालाही वळवता येणार नाही. ही केवीलवाणी धडपड असल्याचे शिंदे म्हणाले.
