होय, मोदीजींनीच कोरोनाची लस तयार केली, देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस तयार केली या वाक्याचा गैर अर्थ घेऊन टीका करणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले आहे. होय, मोदीजींनीच कोणाची लस तयार केली असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

सातारा जिल्ह्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला. ती म्हणाले, जगातील केवळ पाच देशांना कोरोनाची लस तयार करता आली. त्यातील एक भारत आहे. कोरोना लसी साठी लागणारा कच्चा माल काही ठराविक देशांकडे होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबंधांचा वापर करून कच्चा माल उपलब्ध करून दिला. शास्त्रज्ञांच्या बैठका घेतल्या. त्यांना 1800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मी म्हणतो मोदीजींनीच कोरोनाची लस बनवली.

फडणवीस म्हणाले, मोदीजींनी कोरोनाची लस बनवली नसती तर आपल्याला अमेरिका आणि रशिया पुढे भिकेचा कटोरा घेऊन उभे राहावे लागले असते. ते म्हणाले ते अगोदर आमच्या जनतेला देऊ त्यानंतर तुमचे पाहू. असे झाले असते तर प्रेतांचा खच पडला असता. आज आपण येथे जमू शकलो नसतो. देशातील 140 कोटी जनतेला पंतप्रधानांनी कोरोनाची लस मोफत उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील साडेसतरा कोटी जनतेला कोरोनाची मोफत लस मिळाली आहे.