औरंगजेब आमचा आदर्श राजा;औरंगजेब हा दाऊद किंवा राजन आहे का ? – कदीर मौलाना

ज्‍या औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ४० दिवस हाल करून त्‍यांची हत्‍या केली, देशातल्‍या हिंदूंची मंदिरे फोडली, हिंदु महिलांवर अत्‍याचार केले,राज्यात काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. तर काही ठिकाणी यावरून हिंसाचाराच्या घटना देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होतांना दिसून आले. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी पक्षातून बीआरएसमध्ये आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कदीर मौलाना यांनी ‘आपण औरंगजेबाला आदर्श मानतो’ असे वक्तव्य केले आहे. शहरातील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकारपरिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

होय औरंगजेब आमचा आदर्श

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकार पत्रकार परिषदेत बोलताना कदीर मौलाना म्हणाले की औरंगजेब हा चांगला राजा होता. औरंगजेब राजा असताना त्याने अनेक मंदिरांना जागा उपलब्ध करून दिले. तुम्ही कोणाबाबत बोलतात काही इतिहास माहित नाही.औरंगजेबाने कधीच जातीवाद केला नाही.औरंगजेबाच्या राज्यात गंगा जमुना व्यवस्था नांदत होती.त्यावेळी सत्तेची लढाई होती आणि ती आज देखील सुरु आहे.औरंगजेब एक असा राजा होता ज्याने अखंड भारतावर 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले. तर नक्कीच मी औरंगजेबाला आदर्श मानतो.त्यांनी भारतात राज्य केले असून नक्कीच तो आदर्श आहे.

पुढे बोलताना कदीर मौलाना यांनी भाजप देशात मॉब लिंचिंगच्या माध्यमातून, ईडी-सीबीआयच्या माध्यमातून, इन्कमटॅक्सच्या माध्यमातून देशात गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत. दादागिरी करून सत्तेचा उपयोग करून लोकांना घाबरून इतर पक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे जनतेने विचार करायला विकास कोणता पक्ष करणार आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासंबंधी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यावर आता आक्षेप घेणे योग्य नाही. काहीही झाले तरी आपल्या देशात छत्रपती संभाजी महाराजांचाच उदोउदो केला जाईल औरंगजेबाचा कदापि नाही.त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता व सुव्यस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना ठणकावले.काही महिन्यापूर्वी पारनेर तालुक्यातील कार्यक्रमानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोल होते. नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे आंदोलन सुरू असल्याबद्दल विचारल असता फडणवीस यांनी हे उत्तर दिले होते.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो

एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरून वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे कदीर मौलाना यांनी आपण औरंगजेबाला आदर्श मानत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर यावरून बीआरएस पक्षावर देखील टीका होण्यास सुरुवात झाली आहे.कदीर मौलाना यांच्या या वक्तव्यावरून हिंदू बांधवांमध्ये नाराज आहे. या वक्तव्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

छ.संभाजीनगर मध्य विधानसभा मतदार संघातून तीन वेळा निवडणूक लढले तसेच कदीर मौलाना हे गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात सक्रीय होते.छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील एक महत्वाचे मुस्लीम नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख होती.तर राष्ट्रवादीकडून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती.मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते.त्यामुळे त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला.