‘टोमॅटो-टोमॅटो काय करता, परवडत नसेल तर खाऊ नका’ – सदाभाऊ खोत

देशात सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. तब्बल १५० ते १६० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री केली जात आहे. याच दारवरून आता राजकारण देखील तापू लागले आहे. अशातच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी या दारावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. किंमती वाढल्या म्हणून ओरड करणार्या सर्वसामान्य नागरिकांना खोत यांनी चांगलेच फटकारले. टोमॅटो आत स्वीस बँकेत ठेवण्याची गरज आहे. रयत क्रांती संघटनेने महाविकास आघाडी सरकारच्या काळात दूध व बैलगाडी आंदोलन केले होते. आता आमचे सरकार असतानाही 22 मे रोजी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यात्रा काढली.

टोमॅटो काही अणुबॉम्ब नाही. दोन तीन महिने कळ काढा. त्यानंतर ज्या कोणाला टोमॅटो लागतात त्याला सरण रचण्यासही टोमॅटो देऊ. मग सरणासाठी लाकडेच वापरू नका, फक्त टोमॅटोच वापरा, असे खोत म्हणाले. टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन आक्रोश करणाऱ्या शहरी नागरिकांना फटकारले. टोमॅटो मिळाला नाही म्हणून लगेच दोन-चार जण टाचा खुडून मेलेत का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला. सदाभाऊ खोत यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मी याआधी सुद्धा कांदा परवडत नसेल तर टोमॅटो खा असे म्हणालो होतो. आता टोमॅटो नाही तर कांदा खा, असा सल्ला देतो. शेतकऱ्यांची वस्तू महागली की त्याच्या नावाने अशी ओरड करता. अशामुळे शेतमालाची माती होईल. मागील वर्षात टोमॅटोचे भाव खूप कमी झाले होते त्यावेळी कुणी काही बोलले नाही अशी आठवणही खोत यांनी करून दिली.आपल्याकडे काय फक्त टोमॅटोच आहेत का, फ्लावर आहे, कोबू आहे, बटाटे आहेत, घेवडा, शेवगा, उडीद, मूग हे सर्व काही आहे. मग टोमॅटो मिळाला नाही म्हणून दोन-चार जण मेले का? टोमॅटो ही काय जीवनावश्यक वस्तू आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.