टोमॅटोच्या वाढलेल्या दरावर ट्विट करून सर्वसामान्यांची बाजू घेणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टीला शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी चांगलच झोडपून काढलं आहे. तसेच त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी चांगला भाव मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं अशी संतप्त प्रतिक्रिया खोत यांनी दिली.
सदाभाऊ खोत यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना सुनील शेट्टीवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘देशामध्ये आणि राज्यामध्ये टोमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वच लोकं टोमॅटो टोमॅटो करत पागल झाले आहेत. या पागलांमध्ये भर पडली ती म्हणजे सिनेकलावंताची. सिनेकलावंत हे संवेदनशील असतात. सामान्य माणसांची दु:ख वेशीला टागणारी माणसं म्हणजे सिनेकलावंत. पण काही सिनेकलावंत सडक्या डोक्याची आहेत. सुनील शेट्टी हा आर्थिकदृष्ट्या गंबरसिंग आहे. तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही.’
सुरुवातीला सदाभाऊ खोतांनी सुनिल शेट्टीचं विधान सांगीतलं.आजकाल मी टोमॅटो कमीच खातो लोकांना वाटले की मी सुपरस्टार असल्याने या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होणार नाही, पण हे खोटे आहे, आम्हालाही अशा समस्यांना सामोरे जावे लागते असं सुनील शेट्टी म्हणाल्याचं सदाभाऊ यांनी सांगितलं
या विधानावर सदाभाऊ खोत म्हणाले.. जागतिक भिकारी सुनील अण्णा शेट्टी जर कटोरा घेऊन दारी आला तर टमाटू वाढग माई.. म्हणजेच जर सुनिल कटोरा घेवुन तुमच्या दारी भीक मागायला आला तर त्याला टोमॅटो भीक म्हणुन दे गं बाई असं विधान सदाभाऊ खोतांनी केलंय.
