जे विरोधकांची मोट बांधत होते त्यांचीच बोट फुटली – एकनाथ शिंदे

अजितदादा सत्तेत आल्यामुळे काही शंका आहेत, पण हे बेरजेचे राजकारण आहे. ही वैचारिक युती आहे. त्यामुळे चिंता करू नका. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आता घरात बसणारा नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा मुख्यमंत्री तुमच्यासोबत आहे. त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा. पक्ष, संघटन मजबूत करा. सर्वसामान्यांचे सरकार आहे हे तळागाळापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले.

अजित पवार आल्यावर आपलं कसं होणार असं तुम्हाला वाटलं असेल. काही गणितं करावे लागतात. पण गणितं करत असताना आपल्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. तुमची काळजी करणारा मुख्यमंत्री तिकडे बसला आहे. कारण मी घरात बसत नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

गेल्या अडीच वर्षातील बंद कामाला चालना दिली, सर्वांसाठी सर्व घटकांसाठी निर्णय घेतले. विरोधी पक्षांकडे बोलायला शिल्लक नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांना टीका करता आली नाही. पंचामृतमध्ये लोटा भरून प्यायचं नसतं, थोडं थोडं घ्यायचं नसतं. सरकार कोसळेल, 16 आमदार अपात्र होतील असे बोलण्यात आले. मात्र, 220 आमदारांचे पाठबळ एकनाथ शिंदेच्या पाठिशी आहे. राजकारणात बेरजेची समीकरणे असतात, अजितदादांनी विकासाची भावना ठेवून आले. देवेंद्र यांनी सांगितलं आमची युती इमोशनल आहे. आपल्या सरकारला केंद्राचं पाठबळ आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. आणखी दीड वर्षात काय होईल ही भीती अस्लयाने विरोधक मोट बांधण्यांचा प्रयत्न केला, पण त्यांची बोट तुटली.

विरोधकांनी देशाचे पंतप्रधान मोदींच्या विरोधात आघाडी केली, तेव्हा २०१४ मध्ये हिंदुत्वाचं सरकार देशात आलं. २०१९ मध्येही विरोधकांनी मोदींच्या विरोधात एकटवले होते. मात्र, विरोधी पक्षासाठी जेवढे खासदार लागतात, तेवढीही विरोधकांचे खासदार निवडणून आले नाहीत. आता तिसऱ्यांदा विरोधक मंडळी मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत. मात्र, एकत्र येऊनही ते आपल्या नेत्याचं नाव, पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाही, यातचं मोदींजीचा विजय असल्याचं ते म्हणाले,