अधिवेशनाआधी मंत्रिमंडळात मोठा बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेली खाती तात्पुरती इतर मंत्र्यांकडे

पावसाळी अधिवेशन आज म्हणजेच १८ जुलैला सुरू होणार आहे. मात्र याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही खाती वर्ग करण्यात आली आहे. ही सर्व खाती शिवसेनेच्याआमदारांनाच देण्यात आली आहे. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती इतर मंत्र्यांना देण्यात आली. त्यात गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलं आहे.पावसाळी अधिवेशनाच पहिला दिवस सत्ताधारी की विरोधक कोण गाजवणा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता सोमवारीच जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार काँग्रेसमधील ही नाव चर्चेत आहेत.