दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर खासदार डॉ.अनिल बोंडे यांची नियुक्ती संसदीय कार्य मंत्रालयाकडून आदेश जारी

राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा रेल्वे विभागाला व्हावा यासाठी संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने त्यांची दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

१२ जुलै रोजी संसदीय कार्य मंत्रालयाचे अवर सचिव अनिल कुमार यांनी तसे आदेश जारी केले आहेत. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या सूचनेप्रमाणे ही नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील राज्यसभेच्या खासदारांचे डॉ. अनिल बोंडे हे राज्यसभेत प्रतोद म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा रेल्वे विभागाला फायदा व्हावा यासाठी संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने त्यांची दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या उपभोक्ता सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, सध्यस्थितीत सुद्धा ते विविध केंद्रीय मंत्रालयांच्या समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.