शरद पवारांना पाठिंबा देणारे आमदार विधानसभेच्या अधिवेशनाला मात्र गैरहजर

आज अधिवेशनाचा पहिला दिवस, काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार गटाचे एकूण 15 आमदार उपस्थित होते, तर शरद पवार गटाच्या 9 आमदारांनी हजेरी लावली.

राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या फुटीनंतर कोणत्या गटाकडे किती आमदार हे समोर आलेलं नव्हतं, हे आज स्पष्ट होईल अशा चर्चा सुरू होत्या. अजित पवार गटाने आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त, तर जयंत पाटील यांनी आमच्याकडे 19 आमदार असल्याचे म्हटले होते. जितेंद्र आव्हाड यांनी 9 मंत्री वगळता इतर आमदारांची विरोधी पक्षात बसण्याची व्यवस्था करावी असं पत्र दिलं होतं. मात्र कोणत्या गटात कोण आहे, हे दिसण्यापेक्षा आमदारांनी विधानसभा कामकाजात भाग घेणे टाळल्याचे चित्र आहे.

आमदात चेतन तुपे यांनी शरद पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला होता परंतु प्रकृती बरी नसल्याने गेले काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.जूनही काही दिवस उपचार घ्यावे लागतील अशी परिस्थिती आहेत. डॉक्टरांनी मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे, मला अधिवेशानाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाची उणीव जाणवतेय. या सगळ्याला मी मिस करतोय. अशी ट्विट करून दिली.