राज्यात शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळणार मोफत उपचार मिळणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू, रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. ही योजना राज्यात 15 ऑगस्टपासून लागू होणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

तानाजी सावंत यांच्या मोफत उपचाराच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. सध्या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे २.५५ कोटी नागरिक येतात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था आहेत. या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. हा भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल २१ नुसार राईट टू हेल्थ चा नागरिकांना अधिकार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यासंदर्भ सेवा रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्यात यावेत, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अखेर या मागणीला यश आले असून यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिले जाणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २४१८ संस्था असून या सर्व हॉस्पिटलमध्ये वर्षभरात उपचार घेण्यासाठी तब्बल २.५५ कोटी नागरिक येतात.