चित्रपटांमध्ये दोनच खलनायक दिसतात, एक तर राजकारणी किंवा मग पोलीस – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील पावसाळी अधिवेशन संपले आहे. संसदेचे अधिवेशन अजून सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेच रोजच खडाजंगी सुरू आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयएए लीडरशीप अॅवॉर्ड्सच्या निमित्ताने मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत फडणवीस यांनी विविध प्रश्नांची मोकळेपणाने उत्तरे दिली. इंडियन एक्सप्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली.

उपमुख्यमंत्र्यांना ‘ब्रँड पॉलिटिशियन’बाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जो बिकता है, उसी पर ज्यादा चर्चा होती है. राजकारण तसेच आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर देशात झालेल्या चित्रपटांमध्ये सावकार खलनायक असायचे. शोलेच्या काळात डाकू खलनायक असायचे. त्यानंतर तस्कर खलनायक असायचे. आजकालच्या चित्रपटांमध्ये दोनच खलनायक दिसतात, एक तर राजकारणी किंवा मग पोलिस, त्यामुळे राजकारण हे ब्रँड बिल्डिंगच आहे.

जे लोक सातत्याने निवडणुका जिंकतात. लोक ज्यांना पाठिंबा देतात ते राजकारणी उत्तम संवाद साधणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर कम्युनिकेटर आहेत. ते शेवटच्या माणसाशी सुद्धा संवाद साधतात. मला वाटतं हे ब्रँड मोदी आहे. या देशात अनेक नेत्यांनी अशाच पद्धतीने आपला ब्रँड विकसित केला आहे. आताच्या राजकारणात तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कोणत्या प्रकारच्या रिल्स बनवता, लोक तुमच्याबद्दल कोणत्या रिल्स पाहतात यावरून ठरतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम कम्युनिकेटर आहेत. ते शेवटच्या माणसाशी संवाद साधतात. शेवटच्या व्यक्तीलाही वाटतं की हा माणूस माझ्याशी व माझ्याबद्दल बोलतोय. मला वाटतं हे ‘ब्रँड मोदी’ आहे. या देशात अनेक नेत्यांनी आपला ब्रँड असाच विकसित केला आहे. आज त्याचीच गरज आहे. आजच्या राजकारणात तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कोणत्या प्रकारच्या रील्स बनवता, लोक तुमच्याबद्दलच्या कोणत्या रील्स बघतात यावरून ठरतं. मला वाटतं हे फार मोठं आव्हान आहे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्हाला प्रत्येक वेळी आरडा-ओरडा करण्याची गरज नाही. तुम्ही हुशार असायला हवे. स्मार्ट कम्युनिकेशन म्हणजे काही सेन्सेशन्स निर्माण करावे लागतात. पण फक्त सेन्सेशन्स निर्माण केले आणि त्यामागे कृतीची जोड दिली नाही, तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे तुम्ही दाखवत असलेल्या प्रत्येक गोष्टीला कृतीची जोड असायला हवी.