काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा

काँग्रेसचे काही आमदार आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. ​​​​​​ना​रायण राणेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, इंडिया आघाडीत 30 पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार एकत्र आले तर काय फरक पडणार आहे? ते तिघे होते, तरीही ते काही करू शकले नाहीत. तिघांचे दोघे झाले, तरीही काही करू शकले नाहीत. आता दोघांचे पुन्हा तीन झाले आहेत, पुढे चार होतील. पण त्यामुळे काहीही होणार नाही. आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील, आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करत आहोत.

“‘इंडिया’ आघाडीत कितीही पक्ष एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. त्यामुळे आता शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले तर काय फरक पडणार? महाविकास आघाडीत ते तिघे होते, तरी देखील ते काही करू शकले नाहीत. आताही ते काही करू शकणार नाहीत, त्यामुळे काहीही होणार नाही. पण आता काँग्रेसचेही काहीजण आमच्याकडे येतील आणि आम्ही सर्व पक्षाचे सरकार स्थापन करणार आहोत”, असा दावा राणेंनी केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात अजून काही घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार कृषीमंत्री होणार की नाही हे मी नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेच सांगू शकतील, असे महत्त्वपू्र्ण विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केले. त्यांच्या या विधानामुळे शरद पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.