वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस-पवार सत्तेत आहेत. मात्र या तीन पक्षात समन्वय नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहेत.आता अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी देखील चर्चा देखील रंगली आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला होता. दरम्यान एका कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले राजकारणात आम्हालाही एकाच वेळी कितीतरी विरोधकांशी सामना करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात. काही हत्ती असतात. सगळेच एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात. मागील वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाह. गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली ती पाहून आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर म्हणतात, अशी बुद्धीबळ स्टाइल तिरक्या चालींची शब्दफेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.

राजकारणातला बुद्धिबळ खेळणं सोप्प आहे. पण मात्र जगात स्वतःची मुद्रा उमटणं फार कठीण आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. रोटरी क्लबच्या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 जणांना बुद्धिबळामध्ये काल मुकाबला केला. खरंतर त्यांनी राजकारणात यायला हवं होते. राजकारणात देखील एकाच वेळी कित्येक विरोधकांचा मुकाबला करावा लागतो. त्यात काही तिरक्या चालीचे उंट असतात. काही अडीच घरे चालणारे घोडे असतात काही हत्ती असतात. एकमेकांना चेकमेट करण्यासाठी तयारी करत असतात, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि विषेशत: ठाकरे गट त्यांच्यावर टीका करताना दिसतो. त्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

महाराष्ट्रातून आतापर्यंत 7 ग्रँडमास्टर झाले आहेत. त्यात प्रवीण ठिपसे, अभिजीत कुंटे, तेजल बकरे, वैभवी, तसंच, खाडीलकर भगिनींची कामगिरीही मोठी आहे. क्रिकेटसारख्या खेळांकडे बहुसंख्य मुलांचा ओढा असताना विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या महान खेळाडूंनी बुद्धिबळाला ग्लॅमर प्राप्त करून दिलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुद्धिबळाविषयी, विश्वनाथन आनंद यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. तसंच, विरोधकांवर चौफेर फटकेबाजीही केली.