सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या वीज ग्राहकांची संख्या १ लाखाच्या पार

छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करणाऱ्या राज्यातील वीज ग्राहकांच्या संख्येने नुकताच १ लाखाचा आकडा ओलांडला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष लोकश चंद्र यांनी दिली.

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मितीमुळे निर्माण होणारी वीज वापरल्यामुळे संबंधित ग्राहकाचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली, तर ती नेट मीटरिंगद्वारे महावितरणला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी कधी शून्य वीजबिलही येते.राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १,०४,०३५ झाली आहे. रूफ टॉप सोलर प्रकल्पांसाठी घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. महावितरण ग्राहकांना हे प्रकल्प बसविण्यासाठी मदत करते.

गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाली ती नेट मीटरिंगद्वारे ‘महावितरण’ला विकून नंतरच्या बिलात सवलत मिळविता येते. यामुळे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांना कधी-कधी शून्य वीजबिलही येते.राज्यात ६ सप्टेंबरला रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एक लाख चार हजार ३५ झाली आहे. एकूण वीजनिर्मिती क्षमता एक हजार ६५६ मेगावॉट इतकी झाली. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे. राज्यात २०१६- १७ या आर्थिक वर्षात केवळ एक हजार ७४ ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते. त्यांची एकूण क्षमता २० मेगावॉट होती. त्यानंतर महावितरणच्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.ग्राहकांची संख्या १,०४,०३५ राज्यात ६ सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या १,०४,०३५ झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता १,६५६ मेगावॅट इतकी झाली आहे. ही एकत्रित क्षमता एखाद्या मोठ्या औष्णिक किंवा जलविद्युत प्रकल्पाएवढी आहे.२०२१ -२२ ते २०२१ -२२ या एका आर्थिक वर्षात रूफ टॉप सोलरद्वारे होणाऱ्या वीजनिर्मिती क्षमतेत ४२१ मेगावॅटची भर पडली.