जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी पहिले सत्र सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांनी सर्वप्रथम मोरोक्कोच्या भूकंपाबद्दल सहानुभुती व्यक्त केली. जिथे सुमारे 300 लोक मरण पावले आहेत. या दु:खाच्या काळात संपूर्ण जग मोरोक्कोसोबत असल्याचे त्यांनी म्हटले. आफ्रिकन युनियनचा जी-20 गटात अधिकृतपणे सामील केल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यांनीही युनियन अध्यक्षांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
यावेळी आफ्रिकन युनिअनला जी-20 परिषदेचे स्थायी सदस्य देण्यात आले. त्यामुळे आता यापुढे जी-20 नव्हे जी-21 म्हटले जाईल. आज भारत पंडपममध्ये जगभरातील नेत्यांची मायंदळी पाहयाला मिळाली. दरम्यान,जी-20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं.यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्रध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. पण हे करत असताना त्यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी करुन न देता ‘भारत’ अशी करुन दिली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात जगात विश्वासाचे संकट निर्माण झाले असल्याचे सांगितले. 21वे शतक जगाला नवी दिशा देणार आहे.यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे गळाभेट घेत स्वागत केले.त्याचवेळी बायडेन यांना भारत मंडपममध्ये बांधलेल्या कोणार्क चक्राची माहिती दिली. समिटची सुरुवात फोटो सेशनने झाली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वागत भाषण केले. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ आणि सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज सकाळी भारतात आले आहेत.
जी-20 शिखर परिषदेत संबोधनाला सुरुवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को येथील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 चे अध्यक्ष या नात्याने भारत संपूर्ण जगाला एकत्रितपणे जागतिक विश्वासाची कमतरता एका विश्वासात बदलण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयत्न हा मंत्र आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक प्रकाश बनू शकतो.आरोग्य-ऊर्जा-पाणी सुरक्षा असेल वर्तमानासह येणाऱ्या पिढ्यांसाठी आपल्या ठोस उपायांकडं जावचं लागेल.
