आरक्षणात कोणी वाटेकरी होईल असा गैरसमज ओबीसींनी करुन घेऊ नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात उपोषणाला बसले आहेत. त्यात मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडणार आहे. यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, विविध समाजांचे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा ते पक्षीय राजकारणाच्या पलिकडे असतात. त्यामध्ये सरकार, विरोधी पक्ष आणि इतर पक्ष यांनी सर्वांनी मिळून समाज हिताचा विचार करायचा असतो.

आमचं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींमध्ये जी भीती आहे की त्यांचं आरक्षण कमी होणार, अशा प्रकारे सरकारचा कोणताही हेतू नाही. ओबीसी समाजाने गैरसमज करून घेऊ नये. दोन समाज समोरासमोर यावेत असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही. कोणत्याही समाजातील नेत्याने कोणतंही स्टेटमेंट करताना कोणता समाज दुखावणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. ओबीसी समाजानं आपल्या आरक्षणात कोणी वाटेकरी होईल असा गैरसमज करुन घेऊ नये, असं म्हटलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते.

ओबीसी समाजानं असा गैरसमज करुन घेऊ नये. दोन समाज समोरासमोर यावेत असा कुठलाही निर्णय राज्य सरकार होऊ देणार नाही, असा कोणीही प्रयत्न ही करु नयेत. तसेच कुठल्याही समाजानं कुठलंही स्टेटमेंट देताना कुठलाही समाज दुखावणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहनही यावेळी फडणवीस यांनी केलं आहे.

उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरकार, विरोधी पक्ष असेल किंवा कुठलाही पक्ष असेल. या सर्वांनी मिळून समाजाच्या हिताचा विचार करायचा असतो. आजच्या बैठकीचा प्रयत्न हाच असणार आहे की, योग्य निर्णय घेण्यासाठी बैठक आहे. आपल्या कुठल्या मार्गाने जाता येईल. मराठा समाज असो किंवा तर कोणत्याही समाजाचे प्रश्न समोर येत आहेत. जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि इतरही मराठा समाज संघटनांच्या मागण्या आहेत. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून याच्यावर राजकारण न होता. समाजाच्या हिताचा निर्णय कसा घेता येईल, याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.