मुंबईसह देशातील 39 ठिकाणी ईडी ची मोठी कारवाई; बॉलिवूडचे कलाकार ईडीच्या रडारवर

ऑनलाइन बेटिंगसाठी कुप्रसिद्ध झालेल्या महादेव सट्टा अॅपवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने या अॅपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कवर छापे टाकले आहेत. या कारवाईत सुमारे 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. छत्तीसगडचे रहिवासी असणारे रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटींग ऍपचे प्रमोटर असून ते सध्या ईडीच्या रडारवर आहेत.

ईडीकडून मुंबईसह ज्या 39 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, त्यामध्ये एकूण 417 कोटी रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात बॉलीवूड अभिनेते आणि गायक, गायिका,टायगर श्रॉफ, सनी लिओनी, आतिफ अस्लम, गायक राहत फतेह अली खान, अली अजगर, गायक विशाल ददलानी, गायिका नेहा कक्कड, एली एवराम, स्टँडअप कॉमेडीयन भारती सिंह, भाग्यश्री, पुलकित, किर्ती खबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांची या प्रकरणात चौकशी असण्याची शक्यता आहे.बॉलिवूड सेलिब्रिटी आणि गायक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने कोलकाता, भोपाळ, मुंबई इत्यादी शहरांमध्ये महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी जोडलेल्या मनी लाँड्रिंग नेटवर्कच्या विरोधात शोध घेतला असून या प्रकरणातील सर्व पुरावे मिळविले असल्याचे सांगितले आहे.

महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यादरम्यान त्यांनी 417 कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे. आता 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले आहेत. महादेव अॅप प्रकरणातील एका आरोपीचा लग्नसोहळ्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लग्नाचा खर्च ईडीच्या स्कॅनरखाली असून गेमिंग अॅपवरुन बेकायदेशीर रोख रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे.

तपास यंत्रणांनी भोपाळ, कोलकाता आणि मुंबई याठिकाणी केलेल्या छापेमारीत ईडीला अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या आठवड्यात ईडीने काळबादेवी येथील आठ अंगडियांच्या परिसराची झडती घेतली. या अंगडियाने काही महिन्यांपूर्वी महादेव बुक अॅप ऑनलाइन गेमिंग सट्टेबाजी फर्मच्या प्रवर्तकांना सुमारे 106 कोटी रुपयांची रोख शहरातील इव्हेंट मॅनेजमेंट फर्मला वितरित करण्यात मदत केली आहे.