निपाह व्हायरसच्या केरळमधील रुग्णसंख्येमुळे वाढली डोकेदुखी; शेजारील राज्यांनी जारी केला अलर्ट

केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.

कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये (कोडागू, दक्षिण कन्नड, चामराजनगरा आणि म्हैसूर) आणि केरळपासून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणीतही वाढ करण्यात आली आहे.केरळमधील आरोग्यमंत्र्यांच्या कार्यालयाने माहिती देताना सांगितले की, कोळीकोड येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे.\

केरळमध्ये 30 ऑगस्यट रोजी निपाहमुळे पहिला मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू 11 सप्टेंबर रोजी झाला. दोन्ही मृत व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठवले आहेत. निपाहचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. त्यात नऊ वर्षाच्या एका मुलाचा आणि एका 24 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत.केरळ सरकारने म्हटले, की राज्यात आढळून आलेला संसर्ग हा बांगलादेशात सर्वप्रथम सापडलेला विषाणू आहे.

हा व्हायरस माणसातून माणसात पसरतो आणि त्याचा मृत्यूदर अधिक आहे. मात्र त्याचा फैलावाचा वेग कमी आहे, असेही नमूद करण्यात आले. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्च जोखमीत असलेले सर्व ७६ जणांची प्रकृतीस्थिर असल्याचे सांगितले. १३ जणांत किरकोळ लक्षणे दिसली असून त्यांना आता रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला खूप ताप, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, अॅटिपिकल न्यूमोनिया यांसारखी लक्षणं दिसतात. परिस्थिती अधिक गंभीर असल्यास, व्यक्ती 24 ते 48 तासांच्या आत एन्सेफलायटीसची शिकार होऊ शकते आणि कोमात जाऊ शकते. निपाह व्हायरसची लक्षणं 5 ते 14 दिवसात दिसू शकतात. परंतु काही प्रकरणांमध्ये हा काळ 45 दिवसांपर्यंत वाढू शकतो. इतक्या काळात आपण इतक्या लोकांना भेटती की, किती जणांना संक्रमित केलं आहे हे समजणारही नाही. काही प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीला अजिबात लक्षणं दिसत नाही असंही होऊ शकतं.