समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी, जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दोन टप्प्यात 5 दिवसांसाठी महामार्ग बंद राहणार आहे.समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी सांगितले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 10 ते 12 (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) तर दुसरा टप्पा 25 व 26 (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) असेल. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक 10 ते 12 ऑक्टोबरला दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 25 ते 26 ऑक्टोबरला दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.
ज्या पाच दिवशी समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी बंद असेल, त्या दिवशी प्रवाशांना इतर काही पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. यासाठी मुख्य मार्गावरून वाहतूक बंद असलेल्या दिवशी निधोनाजवळील जालना इंटरजेंज आयसी 14 मधून मुख्य मार्गावरून बाहेर पडता येईल. तिथून निधोना एमआयडीसीमार्गे जालना-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरून केंब्रिज शाळेपर्यंत येऊन नंतर उजवीकडे सावंगी बायपासमार्गे इंटरजेंज आयसी 16 वरून पुन्हा मुख्य मार्गावर येता येईल. शिर्डीकडून नागपूरकडे जाणाऱ्या दिशेसाठीही हाच मार्ग विरुद्ध बाजूने वापरता येईल. अर्थात इंटरजेंज आयसी 16 ते इंटरजेंज आयसी 14.
