राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक त्यांनी दिल्याची माहितीही तटकरेंनी दिली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
पक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्यामुळे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी तीन खासदारांवर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना समर्थन दिलं आहे, तशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक असल्याचेही सुनील तटकरे म्हणाले.
तटकरेंनी यावेळी बोलताना म्हटले की, 2 जुलैला जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील सुरूवातीला अजित पवारांना समर्थन दिलं होतं. तशा आशयाचं प्रतिज्ञापत्रक देखील त्यांनी दिलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनी माझ्यावर अपात्रतेची कारवाई करण्यातची मागणी केली. पण ती कारवाई कोल्हेंवर देखील व्हावी कारण त्यांनी अजित पवारांना समर्थन दिल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे ते आमच्यासोबतच आहेत. असं आम्ही मानतो. असं तटकरेंनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. ते म्हणाले की, आम्ही या तिघांविरोधात पीटीशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.
