एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; सरकारकडून दिवाळीत एसटी महामंडळाला 378 कोटींची मदत

अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने गोड बातमी दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. सरकारकडून एसटी महामंडळाला मोठी मदत केली जाणार आहे. किती कोटींची आहे ही मदत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली जाार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या काही काळापासून एसटी कर्मचारी सरकारवर नाराज असल्याचे चित्र दिसत होते. सरकार कर्मचाऱ्यांकडे लक्ष देत नाही अशी टीका वारंवार एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती त्यांची हीच नाराजी लक्षात घेत यावर्षी दिवाळीपूर्वी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी 378 कोटींची मदत दिली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये एसटी महामंडळातून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल या कारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आनंदात आणखीन भर पडली आहे.

आशा सेविकांची दिवाळी गोड

महाराष्ट्रात 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना 7000 रुपये, तर 3 हजार 664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ करण्यासह त्यांना प्रत्येकी 2000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली.

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.