एसटी आंदोलन स्थगित; मंत्री उदय सामंत गुणरत्न सदावर्ते यांच्यात सकारात्मक चर्चा

राज्य शासनात विलीनीकरण, सातवा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने आजपासून एसटीच्या संपाची हाकही दिली होती. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने काही निर्णय घेतल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.

या आंदोलनापूर्वीच सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले असल्याची माहिती आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. सामंत म्हणाले की, पाच महत्त्वाच्या निर्णयांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबतच यासंदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे, असेही सामंत म्हणाले. पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला. बोनस वाढला पाहिजे, यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहीर करतील असेही समंत म्हणाले. तसेत कर्मचाऱ्यांनी आजपासूनचं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, एसटीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने एसटी कष्टकरी जनसंघाकडून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यांना मदत करणे ही आमची भूमिका आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यासोबत या संदर्भात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

बैठकीत घेतलेले निर्णय –

●दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केले जाणार आहे.
●पुरुष, महिलांवर अन्याय होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याकडे दाद मागू शकतात असं पत्रक काढण्याचा निर्णय झाला.
●बोनस वाढला पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि जाहिर करतीलआजपासूनच आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
●दोन हजार 200 नवीन गाड्या येणार 2025-26 ला 2500 बस येणार
●येत्या चार वर्षात एसटीत 9 हजार बसेस दाखल होतील
●दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्या दाखल होतील.