पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता अशी माहिती समोर येत आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. त्यासाठी दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती तपासात समोर आली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या तपासातून ही माहिती मिळाली आहे.
पुणे शहरातील कोथरूड परिसरात १९ जुलै २०२३ रोजी महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनूस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरीचा प्रयत्न करताना पुणे पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असताना शहानवाझ कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते.
दरम्यान पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांनी कट रचला होता. त्यासाठी दहशतवाद्यांना सिरीयामधून सूचना मिळत होत्या, अशी खळबळजनक माहिती या प्रकरणात समोर आली आहे. एनआयएनं पुणे पोलिसांच्या कौतुकासाठी पत्र पाठवलं आहे. या पत्रातून घातपाताच्या कटाची माहिती समोर आली आहे.
