आयसीस प्रकरणात पुणे, मुंबईसह देशभरात देशभरात 44 ठिकाणांवर एनआयएचे धाडसत्र

एनआयएनं आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर एनआयएनं धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेला अटक केलेल्या अतिरेक्यांच्या चौकशीतून महत्वाची माहिती मिळाली. त्यानंतर इसिसचे देशभरातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. पुणे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा भाईंदर यासह कर्नाटकात कारवाई केली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये भिवंडीतील पडघात कारवाई सुरु आहे. एकूण ठाणे ग्रामीणमधील 41 ठिकाणी कारवाई करण्यात आली. पुणे शहरात दोन ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत काही लोकांना ताब्यात घेतले आहे. भिवंडीच्या पडघ्यामुळे काही दिवसांपूर्वी एनआयने कारवाई केली होती.

या छाप्यांदरम्यान, एनआयएने दहशतवाद्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि परदेशी स्थित आयएसआयएस हँडलर्सच्या सहभागासह मोठ्या कटाचा पर्दाफाश केला आहे. एनआयएच्या तपासात भारतामध्ये आयएसआयएसच्या दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क उघड झाले आहे. भारतात दहशतवाद आणि हिंसाचार पसरवण्याच्या दहशतवादी संघटनेच्या योजना हाणून पाडण्यासाठी एनआयए तपास करत आहे. यापूर्वीही असे छापे टाकण्यात आले असून त्यात अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे. भारतामध्ये आयसीसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे.

एनआयएने पुण्यात कोंढवा आणि मोमिनपुरा परिसरात छापे टाकले आहेत. कोंढव्यातील तालाब फॅक्टरी येथील एका सोसायटीमधून शोएब अली याच्या घरी छापेमारी करण्यात आली असून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तर मोमिनपुराच्या गुलमोहर सोसायटीमध्ये अन्वर अलीच्या याच्या घरी केलेल्या छापेमारीतही मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. एटीएसच्या मदतीने ही छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे. यापूर्वी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.