देशात कोरोना रुग्णांच्या संख्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोना 692 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासात कोरोनामुळे देशात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आता देशात 4 हजार 97 कोरोना पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.देशभरातील कोरोना सक्रिय रूग्णांची एकूण संख्या 4 हजार 97 पर्यंत पोहचली आहे.
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे देशात 6 रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महाराष्ट्रतील, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, भारतात जेएन.1 या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे बुधवारपर्यंत एकूण 10 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धपत्रकात स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने कोविड-19 संशयित किंवा सकारात्मक रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. एम्स दिल्लीच्या संचालकांनी बुधवारी कोविड-19 आकस्मिक उपायांबाबत रुग्णालयाच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत, कोविड-19 चाचणी बाबत धोरणे, पॉझिटिव्ह रूग्णांसाठी नेमण्यात येणारी क्षेत्रे आणि त्यांच्या हॉस्पिटलायझेशनवर चर्चा करण्यात आली.
मुंबईत काल (27 डिसेंबर) दिवसभरात कोरोना बाधित आणखीन 19 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे कोरोना बधित रुग्णांची एकूण संख्या 136 वर गेली होती. मात्र दिवसभरात उपचार घेऊन 33 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या 103 होती. कालपर्यंत कोरोनाच्या चाचण्यांमध्ये आणखीन 331 चाचण्यांची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत चाचण्यांची संख्या 2 हजार997 एवढी झाली आहे.
आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये मास्क लावण्याचं आणि स्वच्छता पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. वाढत्या कोरोनारूग्णसंख्येवर सध्या प्रशासन लक्ष ठेवून आहे.
