धावत्या रेल्वेतून उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४४ प्रवाशांचा जीव रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात वाचवला. मध्य आरपीएफ ‘मिशन जीवन रक्षक’ मोहीम राबवित असून यांतर्गत सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कामगिरी बजावली.रेल्वे पकडण्याच्या नादात अनेक प्रवासी धावत्या गाडीत चढतात. प्रसंगी अनेकदा तोल जाऊन गाडी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकून काही लोकांचा जीव गेला. तर धावत्या गाडीतून उतरण्याच्या नादातही अशाच घटना घडतात. यामुळे प्लॅटफॉर्मवर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘मिशन जीवन रक्षक’ विशेष मोहीम राबविली.
एकट्या मुंबई विभागात जीव वाचवणाऱ्या एकूण २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५, पुणे विभागात ४ तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वेमध्ये आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्याप्रमाणे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रित करतात.
रेल्वे सुरक्षा बलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका तसेच रेल्वे मध्ये आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते आपले लक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर केंद्रीत करून असतात.
रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. प्रवासी प्रवास करताना काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात किंवा काही वेळेला विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी जीव वाचवला आहे. एखाद्याचा जीव वाचवण्याच्या या कृतीमुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांप्रती आनंद आणि कृतज्ञतामध्ये वाढ होत आहे.
चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी आरपीएफने ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ ही मोहीम राबविली. गेल्या आठ महिन्यांत ३७२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात १ कोटी ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत मिळविला. यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, मौल्यवान वस्तू, दागिने आदींचा समावेश आहे. मुंबई विभागात सर्वाधिक १६९ चोरीचे गुन्हे नोंदविण्यात आले. सोलापूर ३३, भुसावळ ७७, नागपूर ५६ आणि पुणे विभागात ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
