राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर अमलबजावणी संचालयाने छापेमारी सुरु केली आहे. शुक्रवारी पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. ईडीच्या पथकाने एकूण ६ ठिकाणी छापेमारी सुरु केल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.
आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ईडीच्या एका पथकाने कंपनीवर छापा टाकला. ज्यात पाच ते सहा अधिकारी असल्याचे समोर येत आहे. तर त्यांच्याकडून येथे चौकशी केली जात असल्याचे समोर आले आहे.आणि मुंबईच्या जवळच्या काही ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. ज्यात मुंबईसह इतर सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. दरम्यान ईडीच्या एका पथकाडून रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. रोहित पवार यांच्या कंपन्यांना सातत्याने केंद्रीय व राज्यातील यंत्रणांकडून टार्गेट केले जात आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी प्रशासनाकडून कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
रोहित पवार हे बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ आहेत. आता अमलबजावणी संचालयानलायने मनी लॉन्ड्रींग प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली आहे. यामुळे बारामती अॅग्रो कंपनीच्या संबंधित लोकांच्या घरी छापेमारी सुरु करण्यात आली आहे. रोहित पवार यांचे काका अजित पवार हे सत्तेत आहेत. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यावेळी पुतण्याच्या कंपनीवर छापेमारी केली जात आहे. या प्रकरणात रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्यांकडून प्रतिक्रिया अद्याप आली नाही.
याआधी प्रदुषण महामंडळ आणि साखर आयुक्तांनी बारामती ॲग्रोवर कारवाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या बारामती ॲग्रोवर केंद्रीय तपास यंत्रनेकडून छापा टाकण्यात आला आहे.
